Top News महाराष्ट्र मुंबई

…म्हणून 10 सरकारी पाठशाला कायमस्वरूपी बंद; शालेय शिक्षण विभागाच निर्णय

मुंबई | सरकारी अध्यापन विभागातील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. काही विद्यार्थी संख्या तर शून्यावर गेली आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सराव घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या 10 सराव पाठशाला कायम स्वरूपी बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

पुणे येथील लोणी काळभोरमधील सरकारी अध्यापक सराव पाठशाळा, अमरावतीतील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेशी सलग असलेली पाठशाळा अशा दोन्ही पाठशाळा विद्यार्थी संख्या नसल्याने तातडीने बंद करण्यात येणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने त्याबाबतचा प्रस्ताव सरकारला पाठविला होता. तो मंजूर झाला आहे.

उर्वरित आठ पाठशाळांमधील विद्याध्यांचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून जवळच्या शाळेत करण्यात येणार असल्याचं समजतंय. यामध्ये पुणे येथील भवानी पेठ, मोदीखाना, अमरावतीतील वलगाव रोड, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा येथील सराव पाठशाळा आहेत.

दरम्यान, तेथील शिक्षक आणि कर्मचारी यांचे समायोजन रिक्त पदांवर नतर करण्यात येणार असून यासंदर्भातील समायोजनाचे अधिकार शिक्षण आयुक्तांना आहेत. बंद केलेल्या सराव पाठशालांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे 30 नोव्हेबरपूर्वी अन्य ठिकाणी रिक्त पदे समायोजन होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘…यासाठीही हिरोसोबत झोपावं लागतं’; कंगणाचा पुन्हा जया बच्चन यांच्यावर निशाणा

मराठा समाज आक्रमक!आजपासून कोल्हापूरमधूम मुंबई, पुण्याला दुध पुरवठा बंद

दिवाळीच्या मुहूर्तावर फुटणार अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’

कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा- सदाभाऊ खोत

सुशांत आणि दिशा मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांचं अमित शहांना पत्र, म्हणाले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या