मुंबई | काेरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने अनेक पर्याय अवलंबले आहेत. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकल्यास 1000 रूपयांचा दंड भरावा लागणार आहे.
कोराना हा संसर्गजन्य आजार असल्याने थुंकीमार्फतही पसरू शकतो. त्याची लागण इतर नागरिकांना होऊ शकते यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला गेल्याची माहिती समजत आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास याआधी 200 रूपये इतका दंंड आकराण्यात येत होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दंड आता 5 पटीने वाढवण्यात आला आहे. आता हा दंड 1000 इतका करण्यात आला आहे.
दरम्यान, आपल्याकडे पान, गुटखा आणि सुपारी खावून रस्त्यावर जागोजागी थुंकणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दंड वाढवल्याने आपण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवू शकतो, अशी महानगरपालिकेची यामागची भूमिका आहे. त्यामुळे हा दंड पाच पटीने वाढवण्यात आल्याचं महापालिकेने सांगितलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
राज्य सरकारचे आदेश धुडकावून शाहिदसाठी उघडली जिम
‘हा’ तर निव्वळ बेजबाबदारपणा’; कोरोनाग्रस्त रुग्णावर रितेश संतापला
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या बुधवार पेठेतील ‘तो’ व्यवसायही बंद!
सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही; जितेंद्र आव्हाडांच्या खात्यावरुन चुकीची माहिती प्रसारित
मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत ते कौतुकास्पद!
Comments are closed.