Top News देश महाराष्ट्र

भाजपला धक्का! एनडीएतून आणखी एक मित्रपक्ष बाहेर

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या निषेधार्थ एनडीतून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला आहे. राजस्थानमधील राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने भाजपची साथ सोडली आहे.

भारत सरकारने आणलेल्या नव्या कृषी विरोधी कायद्यामुळे आज राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने एनडीतून बाहेर पडण्याची घोषणा करत असल्याचं राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी अध्यक्ष खासदार हनुमान बेनीवाल यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

मोदींकडे 303 खासदारांचं बळ आहे. त्यामुळेच ते कृषी कायदे मागे घेत नाहीत. 1200 किमी दूर असलेल्या राजस्थानातून शेतकरी दिल्लीकडे येत असल्याचंही हनुमान बेनीवाल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जयपूर, जोधपूर, कोटपुतली, अलवर, नागौर, जैसलमेरसह राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसह बेनीवाल हरियाणा बॉर्डरच्या शाहजहांपूरकडे निघाले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

३१ डिसेंबरला संचारबंदीची अट शिथिल करा; मनसेची मागणी

‘शरद पवारांनंतर तुमचं काय स्थान राहील’; पाटलांचा अजित पवारांना सवा

“सत्ता कोणाच्या बापाच्या मालकीची नसते, जोपर्यंत भाजपची जिरवत नाही तोपर्यंत आम्ही तिघे एकत्र”

“शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संजय राऊतांनीच आग्रह करावा”

‘खडसेंना आलेली ईडीची नोटीस नेमकी कशासंदर्भात?’; खडसेंनी केला खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या