नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका आपल्या खिशात घातली. भारताने चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला न्यूझीलंडसोबत होईल. हा अंतिम सामना याचवर्षी इंग्लंडमध्ये 18 ते 22 जून दरम्यान होणार आहे.
हा सामना इंग्लंडमधील ‘साउथँम्पटन’ येथील रोज बाऊल स्टेडियमवर होणार आहे. यापूर्वी हा सामना ‘लाॅर्डस’ या मैदानात खेळवण्यात येणार होता. मात्र, कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे ठिकाण बदलून ‘साउथँम्पटन’ करण्यात आले आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने याबाबतची माहिती दिली आहे.
‘आयसीसी’ या सामन्यासाठी मर्यादीत प्रेक्षकांनाही सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश देणार आहे. आयसीसी मे अंतिम सामन्याचे ठिकाण बदलाबाबतचा निर्णय इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी चर्चा करुन आणि कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन घेतला आहे. भारताने नुकतेच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत 3-1ने विजय मिळवला. या विजयासह भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत 72.2 टक्केवारीसह अव्वल क्रमांक मिळवत अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले आहे.
दरम्यान, आॅस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वी आपला दक्षिण आफ्रिकेचा नियोजित दौरा रद्द केला. त्यामुळे न्यूझीलंडने 70.0 विजयाच्या टक्केवारीसह याआधीच अंतिस सामन्यात प्रवेश निश्चित केला होता. त्यामुळे आता साउथँम्पटनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी अजिंक्यपद पटकवण्यासाठी अंतिम सामना रंगेल.
थोडक्यात बातम्या –
“जो पर्यंत मुख्यमंत्री गप्प तो पर्यंत विधानसभा ठप्प”
‘पंकजांचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की’.., अजित पवारांचे सूचक वक्तव्य
“सत्ता गेल्यानं अनेकांना सहन होत नाही अन् सांगताही येत नाही”
राखी सावंतचा नागीन अंदाज पाहिलात का?; पाहा व्हिडीओ
भाजपने चार वर्षापुर्वी तिकीट कापलेले तीरथ सिंह उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री!
Comments are closed.