सातारा | आयसीसी टी-20 विश्वचषकात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 85 धावांनी मात करत पुन्हा एकदा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. भारत जरी हरला असला तरी भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंतच्या साखळी सामन्यातील कामगिरी ही अत्यंत प्रभावी होती. यावरून भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आज महिला दिन आणि भारतीय मुली क्रिकेट च्या T20 वर्ल्ड कपच्या फायनलला खेळत होत्या. ऑस्ट्रेलियन मुलींनी भारतीय मुलींचा पराभव केला आहे पण आपल्या मुली फायनलपर्यंत गेल्या याचा आपल्याला आनंद आणि अभिमान पाहिजेच, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. त्यासोबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भारतीय महिला संघाच कौतूक केलं आहे.
भारतीय महिला संघाला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला असला तरी या स्पर्धेतील त्यांची कामगिरी अविश्वसनीय होती.टीम इंडियाचे भविष्य उज्वल आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा विश्वचषक आपलं नाव कोरलं आहे. त्यासोबत ऑस्ट्रेलियानं तब्बल 5 वेळा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केला आहे.
आज महिला दिन आणि भारतीय मुली क्रिकेट च्या T20 वर्ल्ड कपच्या फायनलला खेळत होत्या.
ऑस्ट्रेलियन मुलींनी भारतीय मुलींचा पराभव केलाय पण आपल्या मुली फायनल पर्यंत गेल्या याचा आपल्याला आनंद आणि अभिमान पाहिजेच.#WomensDay pic.twitter.com/yR47cyVumv— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) March 8, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
पुण्यातील कात्रजच्या घाटात भडकलेला वणवा सयाजी शिंदेंनी विझवला
YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुलीला विमानतळावरच रोखलं!
महत्वाच्या बातम्या-
मनसेचं शॅडो कॅबिनेट तयार?; राज ठाकरेंकडून उद्या घोषणा?
ज्येष्ठ नागरिकांच्या अनुदानात दुप्पट वाढ; ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांची घोषणा
“दिल्ली दंगल हा मुस्लीम किंवा काॅंग्रेसचा नव्हे तर डाव्यांचा डाव”
Comments are closed.