मुंबई | शिवरायांचा महाराष्ट्र किती लढवय्या आहे हे आपण साऱ्या जगाला दाखवून देऊ, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्याला संबोधित करुन खबरदारीचं आवाहन केलं.
कोरोना हे एक युद्ध आहे. आपल्याकडे पुरेशा गोष्टी आहेत. आपण घाबरु नका, सरकार तुमच्यासोबत आहे. युद्धाचा आनुभव फार वाईट असतो. पण युद्धासाठी आम्ही सज्ज आहोत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जनतेला कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी प्रेरित केलं.
घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे ‘वॉर अगेन्स व्हायरस’ आहे. आपण खबरदारी घेत आहात, पण आणखी खबरदारी घ्यायली हवी, असं मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यातील चाचणी केंद्र सुरू करण्यावर आज पंतप्रधानांशी चर्चा झाली आहे. तसंच आरोग्यमंत्र्यांशीही चर्चा करण्यात आली आहे. त्यांनीही आवश्यक ती पावलं उचलण्याचं आश्वासन दिलंय. राज्यातील चाचणी केंद्र वाढवण्यासही ते मदतीसाठी तयार आहेत, असंही ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.
ट्रेंडिंग बातम्या-
आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही- उद्धव ठाकरे
सॅल्युट… आईची रुग्णालयात मृत्यूशी झुंज; आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची काळजी!
महत्वाच्या बातम्या-
बायकोला न सांगता मैत्रीणीला घेऊन इटलीला फिरायला गेला अन् कोरोना घेऊन परत आला
चिकन, मटन खाल्याने कोरोना होत नाही- शरद पवार
“आम्हाला फासावर लटकवल्याने बलात्कार थांबणार नाहीत
Comments are closed.