मुंबई | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यावरून राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भाजपचा निवडणूक जाहीरनामा असल्याचं म्हणत यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
ज्या राज्यात निवडणुका तिथे मोठमोठ्या आकड्यांचे पॅकेज द्यायचं, असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच करदात्या मध्यमवर्गाच्या हाताला काहीच लागलेलं नाही, स्लॅब बदलाची आशा होती मात्र अर्थमंत्र्यांनी निराशाच केली असल्याचंही ठाकूर म्हणाल्या.
दरम्यान, 35 हजार कोटी रुपये लसीकरणासाठी या आर्थिक वर्षात राखून ठेवल्याचं अर्थमंत्र्यांनी भाषणात सांगितलं. पण यासाठी कुणाला मोफत, कुणाला पैसे द्यावे लागणार याचा उल्लेख केलेला नाही.
निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भाजपाचा निवडणूक जाहीरनामा आहे. ज्या राज्यात निवडणुका तिथे मोठमोठ्या आकड्यांचे पॅकेज द्यायचं. #Budget2021
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 1, 2021
थोडक्यात बातम्या-
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण निश्चित
अर्थमंत्र्यांकडून PM आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा!
महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
कोरोना लसीसंदर्भात निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा!
नव्या आरोग्य आणि कल्याण योजनांसाठी ‘इतक्या’ हजार कोटींची तरतूद- निर्मला सीतारामन
Comments are closed.