Top News विदेश

बापरे! हॉटेलमध्ये आलेल्या कस्टमरने दिली चक्क लाखो रूपयांची टीप

अमेरिका | हॉटेलमध्ये गेल्यावर खाऊन झाल्यानंतर अनेकदा आपण टीप ठेवतो. मात्र तुम्ही कधी लाखो रूपयांची टीप ठेवल्याचं ऐकलंय का? अमेरिकेतील एका हॉटेलमध्ये गेलेल्या व्यक्तीने चक्क 3 लाख रूपयांची टीप ठेवलीये.

अमेरिकेतील एका इटालियन रेस्टॉरंटमधील ही घटना आहे. ‘अँथनी एट पैक्सॉन’ रेस्टॉरंटने फेसबुकवर एक फोटो शेअर केलाय. या पोस्टमध्ये हॉटेलने एका कस्टमरचं बिल दाखवलंय. यामध्ये 15 हजारांच्या बिलावर 3.6 लाखांची टीप देऊन टाकलीये.

जियाना दी अँजेलो यांनी ही देण्यात आली आहे. जियाना अँजेलो या रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून कार्यरत आहेत.

जियाना अँजेलो स्थानिक वृत्तवाहिनीशी संबंधित बोलताना म्हणाले, “मला टीप मिळाली की मी खूश असते. मात्र एका कस्टमरने 5000 डॉलरचा आकडा सांगितला तेव्हा मला विश्वासच बसला नाही. दरम्यान मी टीपमधून मिळालेल्या पैशांतून कॉलेजचं शिक्षण पूर्ण करणार आहे.”

थोडक्यात बातम्या-

मेसेज आलेल्या व्यक्तीला दिली जाणार कोरोनाची लस; आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

…तर जानेवारीपासून राज्यात लसीकरणाला सुरुवात होईल- राजेश टोपे

कर्णधार विराट कोहलीच्या नावे नवा विक्रम; धोनीलाही टाकलं मागे

संजय राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी; प्रविण दरेकर यांची मागणी

‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका; महाविकास आघाडीची नाही- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या