बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्ली विधानसभेमध्ये सापडला एक गुप्त बोगदा, थेट लाल किल्ल्यापर्यंत जातो गुप्त रस्ता???

दिल्ली | दिल्ली विधानसभेमध्ये एक गुप्त बोगदा आढळुन आला. हा गुप्त बोगदा थेट लाल किल्यापर्यंत जात असल्याची माहिती दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल यांनी दिली आहे. ब्रिटीश सैनिकांना ये-जा करण्यासाठी हा बोगदा निर्माण केल्याची माहिती आहे. स्वातंत्र्य लढ्यात दिल्लीत होणाऱ्या संघर्षापासुन वाचण्यासाठी ब्रिटिशांनी हा सुरुंग खोदला होता.

1993 साली मी आमदार झालो होतो त्यावेळी या गुप्त रस्त्याबाबतच्या अनेक अफवा पसरल्या होत्या. हा रस्ता विधानसभेपासुन लाल किल्यापर्यंत जात असल्याचं बोललं जात होतं. म्हणून यासंदर्भात शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती नसल्याचं निवास गोयल म्हणाले.

आता रस्त्याचं ठिकाण सापडलं आहे त्यामुळे पुढील खोदकाम सुरू करण्यात आलं आहे. कारण हा रस्ता निम्म्यातच बंद झाला आहे आणि मेट्रोचं काम झाल्यामुळे या बोगद्याचे सर्व मार्ग बंद झाल्याच सांगण्यात येत आहे. दिल्ली विधानसभेत गुप्त बोगदा सापडल्यानंतर त्याचे अनेक फोटो व्हायरल झाले असुन त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, दिल्ली विधानसभेला एक इतिहास आहे आणि तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचायला हवा. पुढीलवर्षीं स्वातंत्र्यदिनापर्यंत भारतीय स्वातंत्र्य योद्ध्यांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात येत होती ती खोली लोकांना पाहता यावी यासाठीच काम सुरू आहे, असंही निवास गोयल यांनी सांगितल आहे.

थोडक्यात बातम्या-

तालिबान्यांचा ‘तो’ एक निर्णय! अन् काबूल विमानतळाबाहेरच लावली जाताहेत लग्नं

राष्ट्रवादीचा आपल्याच मित्राला दगा, काँग्रेसला खिंडार पाडत अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“अनिल देशमुखांना फरार घोषित करून त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करा”

‘माझ्याशी लग्न का करत नाहीस?’; शहनाज सिद्धार्थचा ‘तो’ रोमँटिक व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

मुकेश अंबानींचा मोठा प्लॅन तयार, पहिल्यांदाच केला शेअर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More