बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बुधवारनंतर गुरुवारी पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ, जाणून घ्या आकडेवारी

पुणे | शहरातील कोरोनाबाधितांची वाढ सुरुच आहे. आज शहरात दिवसभरात तब्बल 904 नवे कोरानाबाधित आढळून आले आहेत. शहरात संशयितांच्या तपासणीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले असून, अनेक जण खासगी प्रयोगशाळांमधुन तपासणी करण्यास मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत.

पुणे शहरात आज दिवसभरात 7 हजार 585 जणांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी 11.11 टक्के इतकी आहे. शहरातील सक्रिय रुग्णसंख्या 5 हजार 886 इतकी झाली असून, दिवसभरात 562 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पाचवाजेपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 631 इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही इतकी आहे.

शहरात आजपर्यंत 11 लाख 70 हजार 383 हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी 2 लाख 5 हजार 553 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 94 हजार 791 जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात 7 जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी 2 जण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे 4 हजार 876 जणांचा मृत्यू झाला आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘त्या’ प्रकरणावरुन अजित पवारांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच फटकारलं!

कार्तिक आर्यन समोर येताच तिने केलं असं काही की…; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा; जाणून घ्या काय आहे प्रकरण

चोरट्या चीनचा रडीचा डाव; कोरोना लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनच्या निशाण्यावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More