बंगळूरु | कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात केली आहे. शहरात आत्तापर्यंत 11 हजार 181 अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. 28 दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस सोमवारपासून देण्यास सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
दुचाकी आणि तीनचाकी उत्पादक कंपनी ‘टीव्हीएस’ मोटर कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘टीव्हीएस’ कंपनीचे कर्मचारी आणि कुटुंबाचे लसीकरण हे सरकारच्या मार्गदर्शक सुचानांप्रमाणे होणार आहे. त्यांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 35 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे, टीव्हीएस कंपनीने म्हटले आहे.
‘टीव्हीएस’ मोटर कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष आर. आनंदकृष्णन म्हणाले की, कंपनी कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना संपूर्ण मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यामध्ये आपत्कालीन मदत, कॉलवर डॉक्टर उपलब्ध करून देणे, कोरोनाबाबत जनजागृती आणि मानसिक आरोग्य कार्यक्रम यांचा समावेश आहे.
दरम्यान, याआधी ‘रिलायन्स’ कंपनीमध्ये काम करणाऱ्या देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांना मोफत लस देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. रिलायन्स समुहाकडून कर्मचाऱ्यांच्या कोरोना व्हॅक्सिनेशनचा सर्व खर्च उचलला जात आहे. ‘रिलायन्स’ फाउंडेशनच्या चेअरमन आणि संस्थापक नीता अंबानी यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये ही माहिती दिली आहे.
थोडक्यात बातम्या –
बाबो! 8 वर्षीय मुलानं ‘ही’ गेम खेळून मिळवलेत तब्बल 24 लाख; सविस्तर वाचा…
‘कोरोनाचा हा राक्षस…’; मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या भराडी देवीकडे मागीतलं ‘हे’ साकडं
कवठेमहांकाळ पुन्हा हादरलं, उपसरपंचाच्या खुनानंतर आता…
श्रद्धा कपुरने मारले प्रियांकच्या लग्नात ठुमके, पाहा व्हिडीओ!
लँड रोवरची शानदार डीफेंडर व्ही 8 झाली लाँच, जाणुन घ्या किंमत!
Comments are closed.