बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून मला ऐश्वर्याचा राग येतो’; श्वेता बच्चनने सांगितलं कारण

मुंबई | अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर साऱ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. ऐश्वर्यासोबत असलेल्या तिच्या बॉन्डींगमुळे ती चर्चेत आली आहे.

मिस वर्ल्ड ऐश्वर्याची एक गोष्ट तीची ननंद श्वेता बच्चनला प्रचंड खटकते. एवढंच नाही तर ऐश्वर्याच्या त्या गोष्टीमुळे श्वेताने बऱ्याच वेळा राग देखील व्यक्त केला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या ‘काॅफी विथ करण’ या कार्यक्रमात श्वेता आणि ऐश्वर्याने उपस्थिती लावली होती. त्यादरम्यान ऐश्वर्याची कोणती गोष्ट श्वेताला आवडत नाही?, असा प्रश्न श्वेताला विचारण्यात आला होता.

प्रश्नाला उत्तर देत असताना एश्वर्याला कधीही फोन किंवा मेसेज केल्यानंतर ती लवकर रिप्लाय देत नसल्याचं श्वेताने सांगितलं. एवढचं नाही तर एश्वर्याने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड मेहनत करुन आज तीची एक ओळख बनवली आहे, अशी स्तुती देखील श्वेताने यावेळी बोलताना केली.

दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांना एक आराध्या नावाची मुलगी आहे. या मुलीच्या जन्मापासून ऐश्वर्याने बाॅलिवूडमध्ये काम करणं खुप कमी केलं आहे. ती तीचा जास्त वेळ मुलीला देऊ इच्छिते, असं तीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या-

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अखेर अटक!

कंगणा राणावतची आता थेट महात्मा गांधींवर टीका, म्हणाली…

रोड रोमियोला विद्यार्थिनीने भररस्त्यात धू-धू धुतलं, पाहा व्हिडिओ

भर मैदानात वाॅशिंग्टन सुंदर आणि जाॅनी बेअरस्टो भिडले, अन्…

“आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा, तेल स्वस्त झालंय का?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More