बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कपिल शर्मावर भडकला अक्षय कुमार, म्हणाला…

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याच्या नवीन चित्रपटाचा नुकताच एक ट्रेलर रिलीज झाला आहे. अक्षयच्या ‘बेली बाॅटम’ या चित्रपटाचा हा ट्रेलर आहे. सर्वांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा देखील त्याच्या शोमध्ये पुन्हा एंट्री मारणार असून 15 ऑगस्टला त्याचा पहिला एपिसोड येणार आहे. यादरम्यान, कपिलने केलेल्या एका स्तुतीवरुन अक्षयने नाराजी व्यक्त केली आहे. अक्षयने याबाबत एक ट्विट देखील केलं आहे.

लवकर अक्षयचा ‘बेली बाॅटम’ हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षयने गुप्तहेरची भूमिका साकारली आहे. ट्रेलरनंतर सर्वच चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. केवळ अक्षयच्याच चित्रपटाची नव्हे तर सर्वांना प्रसन्न करणारा ‘कपिल शर्मा शो’ची देखील सर्व वाट पाहत आहेत. कपिल शर्मा शोचा नवीन एपिसोड हा 15 ऑगस्टला येणार असून विशेष बाब म्हणजे या एपिसोडमध्ये अक्षय त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे.

कपिलने ट्विट करत अक्षयला त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र आपल्याला उशिरा शुभेच्छा दिल्या असल्याचा राग अक्षयने व्यक्त केला आहे. कपिलच्या ट्विटला रिट्विट करत अक्षयने एक ट्विट केलं आहे. शोमध्ये येणार आसल्याचं समजल्यानंतर शुभेच्छा देतो का?, त्या आधी नाही दिल्या, थांब आता तिथं येऊन तुला बघतो, अशा शब्दात अक्षयने ट्विट केलं आहे.

दरम्यान, अक्षय आणि कपिल हे दोघं प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस आले आहेत. अनेक वेळा अक्षय आणि कपिलने कपिल शर्मा शोद्वारे लोकांचं मोठ्या प्रमाणात मनोरंजन केलं आहे. तसेच आता दोघांना पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहे.

पाहा ट्विटः

थोडक्यात बातम्या-

’15 दिवस धोक्याचे’; केंद्राकडून राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना

41 वर्षांनंतर हाॅकी संघानं रचला इतिहास; रोमांचक सामन्यात भारताचा दणदणीत विजय

मी चुकीचा होतो तर, केंद्रावर ही वेळ का आली?- अशोक चव्हाण

“चित्रा वाघ यांना शिवसेनेत यायचं होतं पण शिवसेनेनं प्रवेश नाकारला, त्यामुळे त्या…”

‘या’ विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नाकात 1000 पटीनं अधिक व्हायरस, संशोधनातून नवी माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More