बाबो! 8 वर्षीय मुलानं ‘ही’ गेम खेळून मिळवलेत तब्बल 24 लाख; सविस्तर वाचा…
कॅलिफोर्निया | आजकालची पोरं मैदानात कमी आणि मोबाइलच्या स्क्रिनवर जास्त खेळत असतात. मोबाईलवर गेम खेळणं हा अनेक लहान मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. मात्र याच आवडीपाई मुलांना आपल्या आईवडीलांचा ओरडाही खावा लागतो. गेम खेळून मिळणार काय? असं पालकांचं म्हणणं असतं. मात्र अमेरिकेतील एका आठ वर्षाच्या मुलानं गेम खेळून तब्बल 24 लाख रूपये कमावले आहेत.
जोसेफ डीन असं नाव असलेला हा मुलगा कॅलिफोर्नियाचा रहिवाशी आहे. फोर्टनाईट ही सुप्रसिद्ध गेम खेळून पैसे कमावणारा जोसेफ जगातील सर्वात लहान मुलगा ठरला आहे. विशेष बाब म्हणजे जोसेफचं गेम खेळण्याचं कौशल्य बघून टीम 33 नं जोसेफला एक हायस्पिड काॅम्प्युटर आणि 24 लाख रूपये देऊन करारबद्ध केलं आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जोसेफला 4 वर्षांचा असल्यापासून फोर्टनाईट ही गेम खेळण्याचं कौशल्य अवगत झालं होतं. जोसेफचे आईवडीलही त्याच्या या आवडीला पूर्णपणे सहाय्य करतात. शाळेच्या दिवसात जोसेफ घरी आल्यावर दररोज न चुकता 2 तास गेम खेळत असतो, असं जोसेफचे पालक सांगतात.
भारतात गेमिंग या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघीतलं जात नाही. मात्र जोसेफला पुढे जाऊन गेमिंगमध्येच करिअर करायचं आहे. जोसेफचं हे यश पाहून त्याच्या आईवडीलांना आनंदाचा पारावार उरला नाही. छोट्यामोठ्या गोष्टी समजून घ्यायच्या वयात जोसेफनं मिळवलेलं हे यश खरच कौतुकास्पद म्हणावं लागेल. तंत्रज्ञानात होत असलेले बदल पाहता येणारा काळ गेमिंग क्षेत्राला सुगीचे दिवस आणणारा ठरेल अशी दाट शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
उद्धव ठाकरेंनी स्वखर्चाने एखादी बालवाडी काढुन दाखवावी- नारायण राणे
‘कोरोनाचा हा राक्षस…’; मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या भराडी देवीकडे मागीतलं ‘हे’ साकडं
कवठेमहांकाळ पुन्हा हादरलं, उपसरपंचाच्या खुनानंतर आता…
श्रद्धा कपुरने मारले प्रियांकच्या लग्नात ठुमके, पाहा व्हिडीओ!
लँड रोवरची शानदार डीफेंडर व्ही 8 झाली लाँच, जाणुन घ्या किंमत!
Comments are closed.