Top News अहमदनगर महाराष्ट्र

दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन देशभर पसरलं पाहिजे- अण्णा हजारे

अहमदनगर | केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. गेले 12 दिवस हे आंदोलन चालू आहे. शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. अशातच ज्येष्ठ समजासेवक अण्णा हजारेंनीसुद्धा या आंदोलनाला पाठींबा देत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सर्व भारतीयांना आवाहन करतो की सध्या दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे ते संपुर्ण भारतात पसरण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हा, असं आवाहन अण्णा हजारेंनी देशवासीयांना केलं आहे.

केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी सर्व शेतकरी वर्गाने रस्त्यावर उतरायला पाहिजे असं घडलं तरंच सरकावर दडपण येईल. फक्त रस्त्यावरून फिरताना कोणताही हिंसक प्रकार घडून द्यायचा नाही, असंही अण्णा सांगितलं आहे.

दरम्यान, सरकार फक्त आश्वासन देत मागण्या मात्र पुर्ण करत  नाहीत. त्यामुळे मी आधीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला होता आणि आताही पाठींबा देत राहीत, असं म्हणत अण्णांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

कृषीमंत्री असताना पवारांनी कृषी कायद्यासंबंधी लिहिलेल्या ‘त्या’ पत्रावर केला खुलासा; म्हणाले…

“कृषी कायदा बदलणार नाही, अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान की कृषीमंत्री?”

देशातील शेतकरी आंदोलनादरम्यान केरळ सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणं जगातील प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य’; राऊतांचं नागरिकांना आवाहन

‘माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!’; अभिनेता हेमंत ढोमेचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या