बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शार्ली हेब्दो’चं आणखी एक वादग्रस्त व्यंगचित्र, वाचा काय आहे प्रकरण

पॅरिस | जागतिक प्रश्नांवर भाष्य करणारे साप्ताहिक ‘शार्ली हेब्दो’ नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतं. फक्त फ्रांसमध्येच नाही तर जागतिक पातळीवर हे साप्ताहिक वाचलं जातं. मागे एका वादग्रस्त व्यंगचित्रामुळे शार्ली हेब्दोच्या ऑफिसवर दहशदवादी हल्ला झाला होता. त्यानंतर हे साप्ताहिक आणखी प्रसिद्धीस आलं. आता या साप्ताहिकमधील आणखी एका व्यंगचित्राने नवा वाद निर्माण झाला आहे.

मेगल माॅर्कल आणि तिचा पती हॅरी यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये इंग्लंडच्या राजघराण्यावर वर्णद्वेषाचा आरोप केला होता. या विषयावर शार्ली हेब्दोने एक व्यंगचित्र काढलं आहे. त्यात त्यांनी ब्रिटनची राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी मेगल यांच्या मानेवर गुडघा ठेऊन बसल्या असल्याचं दाखवलं आहे. हे व्यंगचित्र त्यांनी त्यांच्या साप्ताहिकेच्या कव्हर पेजवर टाकलं आहे.

मेगनने बर्किंगहॅम का सोडलं? असा मथळा या व्यंगचित्राला देण्यात आला आहे. त्याला उत्तर देताना मेनन म्हणते की ‘मला इथे गुदमरल्या सारखं होतंय’ या व्यंगचित्रामुळे काही वाचक नाराज झाले आहेत. हे चित्र म्हणजे भावना भडकवण्याचं काम आहे, असं मत नेटकऱ्यांनी मांडलं आहेत.

दरम्यान, अमेरिकेत मागील वर्षा जून महिन्याच्या दरम्यान एका पोलीसाने जाॅर्ज फ्लाॅईड याच्या मानेवर 9 मिनीटं गुडघा ठेऊन त्याची हत्या केली होती. या घटनेचा संदर्भ या व्यंगचित्रात घेतला आहे. त्यानंतर अमेरिकेत ‘ब्लॅक लिव्हज माॅटर’ हे मोठं आंदोलन उभा राहिलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘तुम्ही प्रचार करू नका’; ‘या’ काँग्रेस नेत्याचं शरद पवारांना पत्र

विद्यार्थ्यांच्या परिक्षेसंदर्भात पुणे विद्यापीठाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

एकाने चूक केली म्हणून संपूर्ण पोलीस दल चुकीचं नसतं- हेमंत नगराळे

“जे आपण कमावलं नाही ते विकून खायचं हा कोणता धर्म?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More