बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित आणखी एक चित्रपट येतोय; ‘हा’ अभिनेता साकारणार मोदींची भूमिका

नवी दिल्ली | 2019 च्या निवडणूकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट आला होता. बाॅलिबूड अभिनेता विवेक ओबेराॅय याने नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली होती. पण हा चित्रपट जास्त चालला नाही. आता मोदींच्या जीवनावर आधारित आणखी एक चित्रपट येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘इंडिया इन माय वेन्स’ या नविन चित्रपटाच्या नावाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष मलिक (बाॅबी) हे हा चित्रपट साकारणार आहेत. सुभाष मलिक यांनी आधीही अनेक चित्रपटाचे दिग्दर्शक केले आहे. गेली 27 वर्ष ते या चित्रपट सृष्टीत काम करत आहेत. त्याचबरोबर ते अयोध्याच्या रामलिलाचे अध्यक्ष देखील आहेत.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभाग 2014 मध्ये स्वीकारला. तेव्हा पासून त्यांनी केलेली विकास कामे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. 29 मार्च पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात होणार आहे. यामध्ये कॅप्टन राज माथूर मोदींची भूमिका साकारणार आहे. तर सुरेंद्र पाल, रझा मुराद, अभिनेता बिंदू दारा सिंग, शाहबाद खान महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.

दरम्यान, भाजप आणि चित्रपट कलाकार यांंच्यातील संघर्ष गेल्या 2 वर्षापासून समोर आला आहे. भाजपचे योगी आदित्यानाथ उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारण्यावर भर देत आहेत. तर बाॅलिबूड कलाकारांमध्ये देखील गेल्या काही वर्षापासून राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळं हा चित्रपट कितपत यशस्वी ठरेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

थोडक्यात बातम्या-

रोड रोमियोला विद्यार्थिनीने भररस्त्यात धू-धू धुतलं, पाहा व्हिडिओ

भर मैदानात वाॅशिंग्टन सुंदर आणि जाॅनी बेअरस्टो भिडले, अन्…

“आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा, तेल स्वस्त झालंय का?”

“लॉकडाऊनपेक्षा मृत्यूदर कसा कमी करता येईल याचं नियोजन करा”

“नरेंद्र मोदी भगवान शंकराचा अवतार आहेत, त्यांनीच देशाला कोरोनापासून वाचवलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More