बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप आंदोलन करायला आजही घाबरलं नाही, उद्याही घाबरणार नाही”

मुंबई | अयोध्येतील राम मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने जमीन खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप ‘आप’चे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते संजय सिंह केला आहे. यावर शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेना भवनावर मोर्चा काढला. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद आणि बाचाबाची झाली.

यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला उत्तर देऊ म्हटलं होतं. यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उत्तर देण्याची वाट कसली बघताय. भाजप आंदोलन करायला आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही. मंत्र्यांना अश्या पद्धतीने बोलावं लागत आणि सामान्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहे, याच आत्मपरीक्षण शिवसेनेनं करावं, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

रामाला आणि राम मंदिराला बदनाम करण्याचं काम शिवसेनेकडून होत असेल तर लोकशाही मार्गाने आंदोलन होईल. ते करायचा आमचा अधिकार आहे आणि कार्यकर्ते ते करतील. सत्ताधारी एवढे घाबरतात हा प्रश्न आहे, असंही आशिष शेलार म्हणाले.

दरम्यान, राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यावर चमत्कार घडेल, असं राऊत यांनी म्हटलं होतं. यावर रोज नवीन प्रयोग करणं आणि स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी वक्तव्य करणं हा उद्योग काही लोकांचा आहे. यात सामना आणि संजय राऊत हे अग्रणी आहेत, असं म्हणत शेलारांनी राऊतांवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या- 

‘करीनाला ‘सीते’ची भूमिका करु देणार नाही’, करीना कपूरला धमकी

“राहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार”

जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छांना अण्णा हजारेंचं रोखठोक उत्तर; म्हणाले….

‘…तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही’; पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारला इशारा

ओबीसी आरक्षणासाठी येत्या 26 जून रोजी राज्यात चक्काजाम आंदोलन- पंकजा मुंडे

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More