बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे ट्विट संभाळून ठेवा; भाजप दिल्लीत इतक्या जागा मिळवून सरकार स्थापन करणार”

नवी दिल्ली | सर्वच एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळताना दिसत असलं तरी भाजपच दिल्लीत सत्तेवर येणार आहे. सर्व अंदाज खोटे ठरणार असून भाजपला 48 जागा मिळणार आहेत. माझं हे ट्विट सेव करून ठेवा, असं भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे.

भाजप दिल्लीत 48 जागा जिंकून सरकार स्थापन करेल. पण कृपा करून आतापासून ईव्हीएमचा बहाणा शोधू नका, असं तिवारी यांनी म्हटलं आहे.

पश्चिम दिल्लीचे भाजपचे खासदार परवेश वर्मा यांनीही त्यांचा अंदाज वर्तवला आहे. वर्मा यांच्या मते भाजपला 50 जागा मिळतील. तर आम आदमी पार्टीला 16 आणि काँग्रेसला अवघ्या 4 जागा मिळणार असल्याचं वर्मा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  दिल्लीत 70 जागांसाठी आज मतदान पार पडलं. बहुमतासाठी अवघ्या 36 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या 11 फेब्रुवारी रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

बाकी सगळं करता येतं पण पैशांचं सोंग काही आणता येत नाही- शरद पवार

आधीच्या सरकारने शिक्षणाच्या आयचा घो केला- संजय राऊत

महत्वाच्या बातम्या- 

“शरद पवार सिर्फ नामही काफी है, पवारांपुढे दिल्लीलाही झुकावं लागतं”

आधीच्या सरकारने शिक्षणाच्या आयचा घो केला- संजय राऊत

“छ. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लालसी सरकारने आमच्या भगिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More