बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सोनिया गांधींची गुलामगिरी करत सत्तेचं लोणी खाणं बरं वाटतं का?”

मुंबई | युतीमध्ये असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक दिल्याचं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. यावरून आता भाजपकडून राऊतांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गेली पाच वर्ष सत्तेत होतो मात्र सत्तेत असूनही गुलाम होतो. गुलामासारखी वागणूक मिळत होती. गेल्या पाच वर्षात शिवसेना सत्तेत असतानाही गावोगावी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेल्याचं संजय राऊतांनी म्हटलं होतं.

विधानसभा निवडणूक एकत्र लढवली. त्यानंतर भाजपशी विश्वासघात केला. दगा दिला. आता स्वत:च्या या कृतीचे समर्थन करण्यासाठी असले उद्योग सुरू आहेत. भाजपने गुलामासारखी वागणूक दिली म्हणता, मग सोनिया गांधींची गुलामगिरी करत सत्तेची लोणी खाणं बरं वाटतं का?, असा सवाल अतुल भातखळकरांनी केला आहे. त्यासोबतच भाजपने गुलामाची वागणूक दिली म्हणताय मग गुलामांचे खिशातले राजीनामे पाच वर्षे बाहेर का आले नाहीत?, असंही भातखळकर म्हणाले. टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

दरम्यान,  संज राऊत जळगावमध्ये शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते. त्यावेळी त्यांनी याबाबत गौप्यस्फोट केला आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

वारकऱ्यांच्या केसाला धक्का लागला तर गाठ आमच्याशी आहे- तुषार भोसले

‘नागिन’ फेम ‘या’ अभिनेत्रीनं सोडला अभिनय; केला ‘हा’ मोठा खुलासा

“ठाकरे सरकारमधील मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का?, नाहीतर मराठा नाहीत जाहीर करा”

“कोणी कितीही रणनीती आखू द्या, आजही मोदी आहेत आणि 2024 लाही मोदीच सत्तेत असतील”

फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली- संजय राऊत

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More