बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांच्या घरी मेजवानी, भाजप नेत्यांनाही जेवणाचं निमंत्रण!

दिल्ली | महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळाच इतिहास आहे. राजकीय पटलांवर जरी मतभेद असले तरी राजकारणाबाहेर त्यांचे कधी मनभेद नसतात. विरोधीपक्षांच्या नेत्यासोबत देखील एकमेकांचे व्यक्तिगतरित्या चांगले संबंध असतात. एकमेकांच्या घरी मेजवान्यांना ते नेहमी उपस्थित राहतात. शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या दिल्लीच्या घरी मेजवानी ठेवली आहे. या मेजवानीला महाराष्ट्रातील सर्व खासदारांना आमंत्रण देण्यात आलं आहे.

संजय राऊत यांच्या या मेजवानीवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. एकीकडे महाराष्ट्रात राजकारण तापलं असताना, या मेजवानीला भाजपचे खासदार उपस्थित राहतील का नाही?, यावर सगळ्याचं लक्ष लागलं आहे. राऊत यांनी ही मेजवानी काही दिवसांपुर्वीच आयोजित केली होती परंतू तेव्हा परमबीर सिंग यांचं लेटर बाॅम्ब फुटलं नव्हतं.

रात्री उशिरा या मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेजवानीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच संपुर्ण कुटूंब उपस्थित राहणार आहे. दिल्लीच्या 15 सफरदजंग लेनवर खासदार संजय राऊत यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या याच घरी हा मेजवानीचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. राऊत यांचं संपुर्ण कुटूंब सध्या दिल्लीत आहे. तर या मेजवानीनंतर प्रसिद्ध गायिका मौथिली ठाकूर यांच्या संगीत मौफिलींचं आयोजन देखील केलं गेलं आहे.

दरम्यान, मागील एका महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकारण विविध मुद्यांवरून तापलेलं आहे. विरोधीपक्ष भाजप सध्या सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर आक्रमकपणे टीका करताना दिसत आहे. त्यामुळे या मेजवानीला भाजप नेते उपस्थित राहतील का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेलं.

थोडक्यात बातम्या-

बीचवरील हाॅट आणि बोल्ड अंदाजातील फोटोंमुळे पुजा बात्रा पुन्हा एकदा चर्चेत, पाहा फोटो!

पोलीस हफ्ते कसे वसूल करतात?; आमिरच्या कार्यक्रमातील IPS अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

पवारांकडून पराभव झालेल्या ‘या’ नेत्याला पंढरपूरमध्ये भाजपचं तिकीट मिळणार?

परमबीरसिंग यांना पहिला झटका; सर्वोच्च न्यायालयानं दिला ‘हा’ सल्ला

“देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा भाजपमध्ये प्रवेश करणार”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More