खेळ

दिलासादायक! दादाच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह

S0713_Eng_India_CM059.jpg

मुंबई |  बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहाशिष याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे सौरव गांगुलीने स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतलं होतं. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी केली गेली. यामध्ये त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

सौरव सध्या आपल्या आईसोबत रहात आहे. त्याच्या आईची प्रकृती वय झाल्याने खराब असते. त्यामुळे दक्षता म्हणून सौरवने कोरोना चाचणी केली होती. ज्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याचं गांगुलीच्या घरातील एका जवळच्या व्यक्तीने पीटीआयशी बोलताना सांगितलं.

गांगुलीचा भाऊ स्नेहाशिषवरही रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. लवकरच त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान, कोरानाने सध्या जगात हाहाकार माजवला आहे. कोरानाने आत्तापर्यंत अनेक कुटूंबच्या कुटूंब उद्ध्वस्त केली आहेत. कोरोना हा काही गरीब श्रीमंत भेदभाव करत नाही. त्यामुळे कोरोनापासून सुरक्षित राहण्याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यायला हवी.

महत्वाच्या बातम्या-

आरोग्य विभागात मुलाखतीशिवाय ‘इतक्या’ हजार जागा लवकरच भरणार- राजेश टोपे

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील लॉकडाऊन दोन दिवस आधीच उठवला

सरकार आतलेच लोक पाडतात, बाहेरचे नाही- सुधीर मुनगंटीवार

मुंबईत दिवसेंदिवस मृत्युसंख्येत होणारी वाढ आणि कमी चाचण्या हा चिंतेचा विषय- देवेंद्र फडणवीस

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रुग्ण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या