अहमदाबाद | इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवली. अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आर अश्विनने 3 बळी घेत त्याला चांगली साथ दिली. या सामन्यावर भारत वर्चस्व गाजवत असताना इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि भारताचा कर्णधार विराट कोहली या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
अहमदाबाद कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना विराट कोहली आणि बेन स्टोक्स या दोघांमध्ये ‘स्लेजींग’ पाहायला मिळाली. संपूर्ण प्रकरण मोहम्मद सिराजच्या एका बाऊन्सरपासून सुरू झालं होतं. त्यानंतर विराट कोहली बेन स्टोक्समध्ये बाचाबाची झाली. दोघांच्या बाचाबाचीमुळे वातावरण तापलं, अखेर दोन्ही पंचांना मध्यस्थी करुन हे प्रकरण सोडवावं लागले.
12 व्या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. षटकातील शेवटचा चेंडू सिराजने बेन स्टोक्सला बाऊन्सर टाकला. यानंतर स्टोक्सने सिराजकडे पाहात काहीतरी कमेंट केली. विराट कोहली बेन स्टोक्सकडे गेला आणि काहीतरी बोलला, मग दोघेजण एकमेकांना उद्देशून काहीतरी बोलू लागले. प्रकरण गरम होऊ लागल्याचे जाणवताच मैदानातील दोन्ही पंचांनी यात मध्यस्थी करत हे प्रकरण सोडवले.
दरम्यान, हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. 14 व्या षटकात सिराज गोलंदाजीसाठी आला. त्यानंतर सिराजच्या या षटकात स्टोक्सने तीन चौकार लगावले. स्टोक्स आणि विराट एकमेकांशी भिडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी उभय संघांध्ये मोहाली येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यातही हे दोघे असेच भिडले होते.
What’s going on here lads? 🇮🇳🏴#INDvENG pic.twitter.com/lThox51Pp4
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) March 4, 2021
थोडक्यात बातम्या –
…म्हणून कोरोना प्रवीण दरेकरांच्या जवळ गेला नसेल; अजित पवारांनी पिकवला हशा
अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव!
‘त्या’ महिलेने स्वत: अंगातील झगा काढला; अनिल देशमुखांनी सांगितलं जळगाव वसतीगृहात नेमकं काय घडलं!
अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव!
देवेंद्र फडणवीसांनंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही दिला ‘मी पुन्हा येईन’चा नारा
Comments are closed.