बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीबाबत पुणे महापालिकेेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे | पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पाश्वभूमीवर आता प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत. सद्यस्थिती पाहता खबरदारी म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्यात होळी आणि धुलीवंदन साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे, जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

सार्वजनिक ठिकाणे,  हॉटेल, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृह, सार्वजनिक व खाजगी मोकळ्या जागा,गृहनिर्माण संस्था , रस्ते, मैदान, गार्डन , शाळा या ठिकाणी होळी साजरी करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे असं आव्हान केलं आहं.

येत्या 28 मार्चला रोजी होळी, 29 मार्चला धुलिवंदन, तर 2 एप्रिलला रंगपंचमी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी शासनातर्फे कडक पाऊल उचलण्यात येत आहे. या आदेशाचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान,पुणे शहरात आज नव्याने 3 हजार 509 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख 44 हजार 343 इतकी झाली आहे. तर नव्याने 24 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 5 हजार 114 इतकी झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘साडी नाही तर बरमुडा घाला’; ममता बॅनर्जींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली

काय सांगता! टिकटॉक स्टारपेक्षाही खरतनाक कावळ्याचा ‘कॅटवॉक’, पाहा व्हिडीओ

‘…म्हणून तर आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण झाली नाही ना?’; भाजप नेत्याचा सवाल

“देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”

देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला- नाना पटोले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More