Top News महाराष्ट्र सांगली

सांगलीत भाजपला धक्का, जयंत पाटलांनी महापालिकेवर उधळला राष्ट्रवादीचा गुलाल

Photo Credit - Facebook /@NCPSpeaks / @BJP4India

सांगली | सांगली मिरज कुपवाड महापालिकेत भाजपला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तिथल्या महापालिकेत राष्ट्रवादीचा गुलाल उधळला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाली आहेत.

सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज पार पडली आहे. भाजपकडे असणारी ही महापालिका काॅंग्रेस राष्ट्रवादीकडे जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, अखेर आज मतदान प्रक्रिया पार पडली आणि राष्ट्रवादीेने महापालिकेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली.

महापौर पदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी तर राष्ट्रवादीकडून दिग्विजय सूर्यवंशी मैदानात उतरले होते. पण आधीच भाजपचे 7 नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या गळाला लागले होते. त्यामुळे सांगली महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार अशी दाट शक्यता होती. सकळी 11 वाजता कोरोनामुळे आॅनलाईन मतदान घेण्यात आले. यात भाजपची 5 मते फुटली. या 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केलं. भाजपचे विजय घाडगे, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम आणि नसीमा नाईक या भाजप नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केले.

दरम्यान, सांगली महापालिकेत भाजपकडे 43 काँग्रेस 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 नगरसेवक आहेत. तरीही महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे पारडं जड होतं. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री विश्वजित कदम या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर जयंत पाटलांनी आपल्या ‘होमग्राऊंड’मध्ये दमदार खेळी करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पराभव केला.

थोडक्यात बातम्या –

‘मी गायब नव्हतो तर या काळात मी…’; संजय राठोडांनी दिलं स्पष्टीकरण

सेक्स कॉल… अभिनेते, नेते, खेळाडूंना मोठा धोका; पोलिसांची धडक कारवाई

पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार?, ‘या’ माणसाचा सल्ला मोदी ऐकणार का?

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड काय म्हणाले?, वाचा जसंच्या तसं…

राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळाची रुपाली चाकणकरांनी उडवली खिल्ली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या