बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाला पळविण्यासाठी भाजपच्या महिला अध्यक्षाचा हवेत गोळीबार, पाहा व्हिडीओ

बलरामपूर | कोरोनाविरोधात लढण्यासाठी रविवारी 9 वाजून 9 मिनिटांला दिवा पेटवून देशातील जनतेने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे. दिव्यांच्या प्रकाशात यावेळी संपूर्ण आसमंत उजळून निघाला होता. मात्र दुसरीकडे बलरामपूर इथे कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षांनी थेट हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजू तिवारी यांनी कोरोनाला पळवण्याासाठी रिवॉल्वरमधून हवेत गोळीबार केला आहे. त्यांनी हा गोळीबार करण्याचा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला आहे.

पंतप्रधान मोदींनी दीप प्रज्वलनाचं आवाहन केलं होतं. दिवे लावून झाल्यानंतर मंजू तिवारी यांनी कोरोनाला पऴवण्यासाठी हवेत गोळीबार करत आहेत. आपण या व्हिडीओमध्ये पाहून शकता हातात रिवॉल्वर घेऊन कशा पद्धतीनं त्यांनी गोळीबार केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बलरामपूर इथे घडली आहे.

दरम्यान, अशा पद्धतीनं हवेत गोळीबार केल्याप्रकरणी त्यांच्यावर पक्ष आणि पोलीस कारवाई करणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाविरोधी लढ्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन!

पुण्यात 24 तासात कोरोनाचा तीसरा बळी; मृतांची संख्या पाचवर

महत्वाच्या बातम्या-

आजची धक्कादायक बातमी; महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाचे 113 नवे रुग्ण

मोदींच्या आवाहनाला देशवासीयांचा प्रतिसाद; घराघरात पेटले दिवे

सांगलीकरांसाठी मोठा दिलासा; इस्लामपूरमधील 4 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More