बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोहलीनं शाहबाज अहमदला चेंडू सोपवला अन् सामना बंगळुरुच्या बाजूने झुकला

चेन्नई |  आयपीएलचा 6वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात खेळण्यात आला. सनरायजर्स हैदराबाद हा सामना सहज जिंकेल अशी चिन्हे असताना कोहलीने आपली जादू चालवली. अनपेक्षितपणे शाहबाज अहमद गोलंदाजी दिली आणि सामना बंगळुरुच्या बाजूने झुकला आणि अखेरच्या 4 षटकात धारदार गोलंदाजी करत बंगळुरूनं हा सामना अवघ्या 6 धावांनी जिंकला.

सनरायजर्स हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूची सुरूवात चांगली झाली नाही. कोरोनातून नुकताच बरा झालेला देवदत्त पडिक्कल स्वस्तात परतला. कर्णधार विराट कोहलीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. कोहलीने 29 चेंडूत 33 धावा केल्या. तर त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी चालू केली. त्याने 41 चेंडूत 59 धावा केल्या. त्या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 20 षटकात 149 धावा करता आल्या. तर हैद्राबादकडून जेसन होल्डरने 3 बळी घेतले.

150 धावांचा पाठलाग करताना हैद्राबादचा सलामीवीर वृद्धीमान शाहा लवकर बाद झाला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी चांगली फलंदाजी करत धावसंख्या पुढे वाढवली. वॉर्नर 37 चेंडूत 54 धावा केल्या. पण वॉर्नर बाद झाल्यानंतर हैद्राबाद चा संघ पतत्यासारखा कोसळला. 16 वं षटक चालू असताना संघाचे केवळ 2 गडी बाद झाले होते. पण पुढच्या 4 षटकात 7 गडी झाले. अखेरच्या 24 चेंडूत हैद्राबादला 32 धावांची गरज होती. शाहबाज अहमदने 16व्या षटकात हैद्राबादच्या 3 महत्वाच्या खेळाडूंना बाद केलं. त्यानंतर सामन्याच पारडं फिरलं. अखेरच्या षटकात हैद्राबादला जिंकण्यासाठी 16 धावा करण्याच्या होत्या. पण यात त्यांनी 9 धावा केल्या. आणि बंगळुरू ने हा सामना 6 धावांनी जिंकला.

दरम्यान, या सामन्यात शाहबाज अहमद याची 16 व षटक सर्वात चर्चेत राहील. यात त्याने जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे आणि अब्दुल समद ची विकेट घेतली.

थोडक्यात बातम्या-

उस्मानाबादेत एकाशेजारी एक 19 चिता पेटल्या, जागा कमी पडल्यानं 8 अंत्यसंस्कार उद्या

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात गारपिटीमुळे गारांचा खच, विश्वास बसणार नाही असा व्हिडीओ-

संचारबंदीमुळे परप्रांतीय मजूर परतीच्या वाटेवर; बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी

जाणुन घ्या पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी

संचारबंदीकाळात महाराष्ट्रात दारू मिळणार की नाही?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More