बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमचं ठरलंच तर गेल्यावेळेस सारखं शपथविधी झाल्यावरच कळेल – चंद्रकांत पाटील

पुणे | महाविकास आघाडीच्या सरकारचा अर्धा कार्यकाळ पुर्ण झाला नाही तो पर्यंतच सरकार पडेल की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या चर्चेला कारण ठरलंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात झालेली कथित भेट. राष्ट्रवादीने ही भेट झाली नसल्याचं सांगितलं आहे, तर अमित शहा यांनी या प्रकरणावर सुचक वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील माध्यमांना प्रतिकिया दिली आहे.

भाजप आणि राष्ट्रवादीत काही ठरलंच तर गेल्यावेळेस सारखं शपथविधी झाल्यावरच कळेल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. राजकारण राजकारणाच्या जागी असतं. मात्र नेत्यांनी एकमेकांना भेटलं पाहिजे. अलिकडच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून गाठी भेटी कमी झाल्या आहेत. अमित शहा आणि पवारांची भेट ही राजकीय कारणासाठी होईलच असे नाही. त्यामागे एखादं समाजोपयोगी काम देखील असु शकतं, असं पाटील म्हणाले.

पवार आणि शहा यांच्यात भेट झाली की नाही हे मला माहित नाही. पण अमित शहा यांच्या वक्तव्यावरून भेट झाली असावी. राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये भेट झाली नाही हे सांगायची चढाओढ लागली आहे. त्यांच्या या चढाओढीमुळे भेट झाली आहे हे सिद्ध होत आहे. महाविकास आघाडीचे नेते वारंवार सांगतात की सरकारला कोणताही धोका नाही. यावरून सरकारमध्ये सर्व काही अलबेल नाही हे सिद्ध होत आहे, असं देखील माध्यमांशी बाेलताना पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान,  शरद पवार आणि अमित शहा यांच्यात भेट झाली नसल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळं शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसत आहे. तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या हालचालीवर देखील सर्वांचे लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार-अमित शहांची भेट; नव्या पिढीला हे राजकारण समजणार नाही”

‘त्यानं माझ्या स्कर्टमध्ये हात घातला अन्…’; ‘या’ अभिनेत्रीनं सांगितलं होळी न खेळण्यामागचं धक्कादायक कारण

भाजप नेत्याकडून भाजपच्याच कार्यकर्त्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

शरद पवारांना नेमकं काय झालंय?; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

…म्हणून हार्दिक पांड्यानं भर मैदानात घातला साष्टांग दंडवत, पाहा गमतीदार व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More