मुंबई | महाराष्ट्रातील शिवसेना हा देशात अजिंक्य असा पक्ष आहे म्हणूनच आम्ही 105 आमदार घरी बसवले असल्याचं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.
राऊतांच्या वक्तव्यावर प्रश्व विचारला असता, राष्ट्रवादी खूप महत्त्व घेतं असून काँग्रेस हा असून नसल्यासारखा पक्ष आहे आणि शिवसेनेचं अस्तित्त्व संपत चाललं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणुकीध्ये भाजपने एक जागा जिंकली तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पाच जागा जिंकल्या मात्र शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे शिवसेना अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष असलेला पाटील म्हणाले.
दरम्यान, सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे ही कुठे तरी वादाची सुरुवात आहे असं मला वाटत नसल्याचं पाटील यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
रतन टाटा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गौरवोद्गार; म्हणाले…
धक्कादायक! सावत्र आईने चिमुकल्याला गरम तव्यावर उभं करत दिले चटके
ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत- सुवेंदू अधिकारी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन
ममता दीदी, ही तर सुरूवात निवडणुकीपर्यंत एकट्याच रहाल- अमित शहा