Top News नाशिक महाराष्ट्र

“भाजपने पराभवातून धडा घ्यायला हवा, देशात आता ईडी आणि सीबीआयचं राजकारण चालणार नाही”

नाशिक | विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र येत सहापैकी 4 जागा मिळवल्या. त्यामुळे भाजपला आपल्या हक्काच्या जागा गमवाव्या लागल्या. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

विधान परिषदेच्या झालेल्या निवडणुकीवरून भाजपने धडा घ्यायला हवा. त्यांनी आता जमिनीवर उतरून काम करावं, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच देशात आता ईडी आणि सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण चालणार नसल्याचंही भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ लासलगाव येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनाही धारेवर धरत त्यांच्यावर टीका केली.  काही दिवसांपुर्वी इतरांना इकडेतिकडे पाठवण्याची भाषा करणाऱ्या पाटलांचा डाव त्यांच्यावरच उधळला असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे चमत्कार झाला. तिन्ही पक्षांची युती झाल्यामुळे मते विभागली गेली नसल्याचंही भुजबळांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

‘कंगणा राणावत म्हणजे हिमाचलाचं सडलेलं सफरचंद’; या खासदाराची कंगणावर टीका

“विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी रणजितसिंह डिसलेंची शिफारस करणार”

मेरे सैय्या सुपरस्टार; लग्नमंडपात नवरीनं केलेल्या डान्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ

“लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं”

“आत्मचिंतनाची बैठक त्यांच्याकडे जास्त; आम्ही कृती आणि अॅक्शनवाले”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या