बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सचिन वाझे जणू ओसामा बीन लादेन…’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | विधानसभेत मनसुख हिरेन प्रकरणावरून भाजपनं महाविकास आघाडी सरकारला चांगलंच कोंडीत पकडलेलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी अखेर मौन सोडलं आहे. सचिन वाझे जणू ओसामा बीन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जात असून कोणत्याही गुन्ह्यात आधी फाशी अन् नंतर तपास असं करता येत नाही, असं वक्तव्य ठाकरेंनी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे म्हणालेे की, राज्यात सध्या एखाद्या व्यक्तीला टार्गेट करण्याची नवी पद्धतच निर्माण झाली आहे. तपास पूर्ण होण्याआधी एखाद्या व्यक्तीवर सरसकट आरोप करणं योग्य नाही. तसेच मनसुख हिरेन प्रकरणी सरकार अतिशय गंभीरपणे तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

देवेंद्र फडणवीसांकडे मनसुख हिरेन प्रकरणी काही कागदपत्रे आणि पुरावे असतील तर ते सादर करावेत, पोलिसांकडून त्यापद्धतीनं तपास करण्यात येईल. असं स्पष्ट करतानाच फडणवीसांनी कागदपत्र दिली म्हणजे लगेच निकाल द्यायचा का?, असा सवालही ठाकरेंनी यावेळेस उपस्थित केला आहे.

सचिन वाझे याआधी पूर्वी शिवसेनेत सामील होते. मात्र त्यांनी पक्षाचा राजिनामा दिल्यानंतर शिवसेनेचा आणि वाझे यांचा काहीही संबंध नाही.  मनसुख हिरेन प्रकरण लावून धरलं, तर डेलकर प्रकरणात तर भाजपचाच मंत्री आहे. मग या घटनांकडे पक्षपातीपणं का बघायचं? सचिन वाझेलाच का लटकवताय?, असा सवालही ठाकरे यांनी यावेळेस उपस्थित केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

जागतिक अंतिम कसोटी सामना ‘लाॅर्डस’ नव्हे तर ‘या’ ठिकाणी होणार

“जो पर्यंत मुख्यमंत्री गप्प तो पर्यंत विधानसभा ठप्प”

‘पंकजांचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की’.., अजित पवारांचे सूचक वक्तव्य

“सत्ता गेल्यानं अनेकांना सहन होत नाही अन् सांगताही येत नाही”

राखी सावंतचा नागीन अंदाज पाहिलात का?; पाहा व्हिडीओ

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More