मुंबई | धारावीत कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आधीच आरोग्य विभागाची चिंता वाढली असताना आता अजून एक रुग्ण सापडला आहे. धारावीत एका सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. वरळी कोळीवाडयापाठोपाठ दाटीवाटीच्या धारावी परिसरात कोरोनाने शिरकाव केला असल्याने धोका निर्माण झाला असून आरोग्य यंत्रणांसमोर मोठं आव्हान आहे.
धारावीत करोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आधीच आरोग्य विभागाची चिंता वाढली असताना आता अजून एक रुग्ण सापडला आहे. धारावीत एका सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.
महापालिकेच्या 52 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. हा सफाई कर्मचारी वरळीचा रहिवासी आहे. धारावीत त्याला तैनात करण्यात आलं होतं. कोरोनाची लक्षणं आढळल्याने अधिकाऱ्यांना त्याला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितलं होतं. यावेळी त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं.
दरम्यान, सध्या या सफाई कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. या सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंब आणि सहकाऱ्यांना क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाला संपवण्यासाठी रोहित पवारांनी केलं खास आवाहन, सुचवली नवी आयडिया!
लॉकडाऊनच्या काळात डॉ.आंबेडकर जयंतीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले
महत्वाच्या बातम्या-
‘मरकज’च्या कार्यक्रमावर शरद पवारांनी सोडलं मौन; म्हणाले…
कोरोनाने घेतला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तिचा बळी
जमत नसेल तर घरी जा, हॉस्पिटलला उकिरड्याची अवकळा पाहून तुकाराम मुंढेंचा संताप
Comments are closed.