जालना | जालन्यात अतिशय धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. चार जणांच्या टोळक्याने एका प्रेमी युगलाला मारहाण केली. संबंधित मुलीचा विनयभंग करत व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
तलावाशेजारी बसलेल्या प्रेमी युगलातील संबंधित मुलाची काॅलर पकडून त्या मुलाला तरूणांनी मारहाण केली. आम्ही काही चुकीच केलं नाही. इथे तळ होतंं म्हणून आम्ही बसलेलो होतो. दादा प्लीज आम्ही परत नाही बसणार इथे, अशा शब्दात तरूण टोळक्याला गयावया करत होता.
टोळक्यातील एक तरूण मुलीला तसंच पकडत ठेवलं होतं. एकजण हिच्या बापाला फोन लाव आणि बापाला बोलावून घेत, असं म्हणत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, हे प्रकरण माध्यमांकडून पोलिसांना समजत असेल तर पोलीस काय करत आहेत?. पोलीस अनभिज्ञ असतील तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. राज्य सरकार यावर काय भूमिका घेत हे कळायला हवं. त्यामुळे आपण फक्त भाषण नको तर कारवाई करा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
भगवाधारी गुंडानकडून जालनामध्ये प्रेमी युगलाला तरुणांकडून बेदम मारहाण.
तरुणीसोबत विनयभंग केल्याचा तरुणांवर आरोप.
धक्कादायक व्हिडिओ समोर. @bb_thorat @INCMaharashtra @AdvYashomatiINC @MahilaCongress @charulata_tokas pic.twitter.com/97KQ4nq6WX
— Shilpa Bodkhe INC (@BodkheShilpa) January 31, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
अजित पवारांना झाली ‘त्या’ शपथविधीची आठवण; म्हणाले…
बाबरी मशिदीबाबतच्या माझ्या मुलाच्या ‘त्या’ वक्तव्याचा मी निषेध करतो- अबू आझमी
महत्वाच्या बातम्या-
कोण होते गांधीजी?; पाहा रितेश कसं समजावून सांगतोय आपल्या मुलांना! पाहा व्हिडीओ
काँग्रेसचे नेते सत्तेसाठी लाचार आहेत- राधाकृष्ण विखे पाटील
एकता कपूरला पद्मश्री मिळतो, मग बाबांना का नाही?; खाशाबा जाधवांच्या मुलाचा सवाल
Comments are closed.