बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! बिस्कीट खाल्लं नाही तर मुलांच्या जीवाला धोका; ‘या’ शहरात पसरली अफवा अन्…

लखनऊ | लहान मुलांना कॅडबरी आणि बिस्कीटं आवडतात. मात्र बिस्कीट खाल्लं नाही तर मुलांच्या जीवला धोका होऊ शकतो, असं आपण पहिल्यांदाच ऐकलं असेल. बिहारमधील या अफवेने दुकानदारांची चांगलीच चंगळ झाली आहे. या प्रकाराची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

बिहारमध्ये या काळात जितिया पर्व सुरु असतो. यामध्ये ज्या महिलांना मुलगा असतो, त्या महिला आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात. याच काळात कोणीतरी एक अफवा पसरवली. त्यानुसार, एका प्रसिद्ध कंपनीचं बिस्कीट खाल्लं नाही तर मुलाच्या जीवाला धोका होऊ शकतो.

या अफवेनंतर प्रत्येकांनी दुकानात जाऊन ते बिस्कीटं आणलं. त्यामुळे बिहारमधील त्या प्रसिद्ध बिस्कीटांचा स्टाॅक बघता-बघता संपला. ही अफवा असली तर बिहारमधील लोकांनी याला सत्य समजून बिस्कीटं खरेदी केली.

दरम्यान, ही अफवा कोणी आणि का पसवरली हे अद्याप समजलं नाही. मात्र या अफवेमुळे दुकांदारांची चांगलीच चंगळ झाली आहे. तसेच या सर्व हस्यास्पद प्रकराची देखील चांगलीच चर्चा झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी अजूनही काँग्रेससोबतच, सध्या तरी पक्ष सोडण्याचा विचार नाही”

…अन् 7 सेकंदात 7 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली; पाहा व्हिडीओ

कारचालकाची मुजोरी! नियम मोडल्याचा जाब विचारल्यावर केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका! पेट्रोल आणि डिझेलनंतर आता सिलेंडरच्या किंमती वाढण्याची शक्यता

“देवेंद्र फडणवीस सरकारने काढलेला ‘तो’ अध्यादेश लागू करावा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More