बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मागच्या जन्मी पाप केलं तो ‘नगरसेवक’ आणि महापाप करतो तो ‘महापौर’ होतो- देवेंद्र फडणवीस

पुणे | ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं ते नगसेवक आणि जो महापाप करतो तो महापौर होतो. कारण काम केलं तरी त्यांना शिव्या खाव्याच लागतात, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा नागरी सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राजकारणात संयम महत्वाचा आहे. तुम्ही कधी आणि कुठे काय बोलावे हे समजलं पाहिजे. माध्यमांपुढे काय बोलावं?, हे समजलं तर तुम्ही यशस्वी होता, असा सल्ला फडणवीस यांनी मोहोळ यांना दिला.

महापौर मुरलीधर मोहोळ हे हाडाचे कार्यकर्ते आहे. ही त्यांच्या आयुष्याची सुरुवात आहे. ते राज्याचे उमदे नेते म्हणून पाहायला मिळतील. मी पण दोनदा महापौर झालो आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेकडून शहराचा भौतिक विकासबरोबर सर्वांगीण विकास करणं गरजेचं आहे. 21 व्या शतकातील शहरांकडून अपेक्षा वेगळ्या आहेत, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

 

ट्रेंडिंग बातम्या-

सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे; शरद पवांरांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कानमंत्र

हो खरं सांगतोय; सई ताम्हणकरच आहे सविता भाभी!

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेतलं नाराजीनाट्य!; भास्कर जाधवांनी झटकला राऊतांचा हात

स्वतंत्र लढले असते तर मुख्यमंत्री झाले असते का?; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सवाल

“महाराजांनी फक्त आवाज द्यावा आम्ही संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या समर्थनार्थ उतरू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More