बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे – भाई जगताप

मुंबई |  अर्थसंकल्पावर बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शब्दांत हल्ला चढवला आहे. सध्या देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांना डोळ्यापुढे फक्त मुंबई महापालिका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार या तीनच गोष्टी दिसत आहेत. असं भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर प्रहार केला आहे. हा अर्थसंकल्प राज्य सरकारचा की मुंबई महापालिकेचा? हा प्रश्न निर्माण होतो आहे. अर्थसंकल्पातून नमूद करण्यात आलेले अनेक प्रकल्प आमच्या काळात सुरु झालेले आहेत. त्यात काहीही नवीन नाही, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात मुंबई पालिकेच्या निवडणूका डोळ्यापुढे ठेवून अर्थसंकल्प बनवला असेल. ते त्यांच्या डोक्यात असेल आणि त्यातूनच ते अर्थसंकल्पाला नावे ठेवत आहेत. फडणवीसांना सुचलंही नाही अशा अनेक गोष्टी या सरकारने करुन दाखवल्या आहेत, असा दावा जगताप यांनी यावेळी केला.

दरम्यान, मराठा आरक्षणावरुनही जगताप यांनी निशाणा साधला. तत्कालीन फडणवीस सरकारने जे मराठा आरक्षण दिले आहे ते चुकीचं होतं, असं देशाचे अॅटर्नी जनरल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले आहे. अशी बाब समोर आली आहे. त्यामुळे फडणवीस सरकारने तेव्हा केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आरक्षण जाहीर केले नव्हते ना, अशी शंका निर्माण झाली आहे, असंही भाई जगाताप म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

‘भाजपची मक्तेदारी आहे का?, अर्थसंकल्प मांडणं हे आमच्यासाठी नवीन नाही’; अजित पवार आक्रमक

अखेर अमृता फडणवीसांच नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा व्हिडीओ

कारखान्यात 500 लोकं चालतात, लग्नात 100 लोकंही नाही; कोरोनाशी अधिकाऱ्यांची सेटिंग?

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पातील ‘या’ महत्वाच्या दहा घोषणा, जाणून घ्या!

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात पुण्यातील रिंग रोडबाबत मोठी घोषणा?, वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More