सांगली | सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव गावात उपसरपंच निवडीवरून एका ग्रामपंचायत सदस्याचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. बघायला गेलं तर यानिमित्ताने ग्रामपंचायत निवडणुकांमधील गावपातळीवरील राजकारण हे कोणत्या थरापर्यंत जावू शकतं हे पाहायला मिळते. पांडुरंग काळे असं मृत ग्रामपंचायत सदस्याचं नाव आहे.
बोरगाव गावातील 55 वर्षीय पांडूरंग काळे या ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. पांडूरंग काळे हे शिवसेना पक्षाचे सदस्य होते अशी माहीत सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी खून केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. समस्थ बोरगावमधील लोकांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पांडूरंग काळे यांचा खून झाला असून या घटनेमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे 2 सदस्य जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या घटनेप्रकरणी चौकशीला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. पांडुरंग काळे यांच्या खून प्रकरणामुळे गावपातळीवर ग्रामपंचायतीमध्ये होत असलेले राजकारण कोणत्या पातळीला जावू शकतं हे बघायला मिळतं.
थोडक्यात बातम्या –
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर राज्यपालांचा मोठा निर्णय
…म्हणून कोरोना प्रवीण दरेकरांच्या जवळ गेला नसेल; अजित पवारांनी पिकवला हशा
‘देशाची संपत्ती विकणं चुकीचं’; सोनिया गांधींचा नरेंद्र मोंदींवर निशाणा
इम्रान ताहिरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पण म्हणाल, ‘खेळभावना असावी तर अशी’, पाहा व्हिडिओ
‘त्या’ महिलेने स्वत: अंगातील झगा काढला; अनिल देशमुखांनी सांगितलं जळगाव वसतीगृहात नेमकं काय घडलं!
Comments are closed.