नवी दिल्ली | देशातील महासत्ता असलेल्या अमेरिका देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये बायडन यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांचा पराभव केला. ट्रम्प यांनी व्हाईट व्हाऊसमधील आपल्या सामानाची आवराआवर करायला घेतली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉलीडे रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी चर्चेत राहिलेल्या वाक्याचा वापर केला.
आम्ही प्रयत्न करत आहोत की आम्हाला आणखीन चार वर्षे सेवेसाठी मिळावेत. म्हणूनच मी तुम्हाला भेटीसाठी चार वर्षांनंतर पुन्हा येईन असंच आत्ता सांगू शकतो, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
ही चार वर्षे खूपच छान असल्याचं ट्रम्प आपल्या कार्यकाळाबद्दल बोलताना म्हणाले. रिसेप्शन पार्टीवेळी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय समितीमधील अनेक सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, सेव्हन लेटर इनसाइड नावाच्या एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ट्रम्प यांनी 2024 ची निवडणूक लढवली तर 66 टक्के रिपब्लिकन मतदार त्यांना मतदान करतील, असं सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटीव्ह राहतील पण आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह”
सुपर न्यूमररी पद्धतीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक- खासदार संभाजीराजे
“शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार नाही, पवार इज पॉवर”
डाॅ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार!