Top News ठाणे महाराष्ट्र

बाबो! एक थाळी संपवा अन् मिळवा एक तोळ सोनं, जाणून घ्या ही भन्नाट ऑफर

Photo Credit- Pixabay

उल्लासनगर | गेल्या काही वर्षापासून हाॅटेल व्यवसाय वाढताना दिसत आहे. परप्रांतियांसोबत स्थानिक लोक आता हाॅटेल व्यवसाय सुरू करुन मोठमोठ्या हाॅटेल सेवा चालू करत आहेत. आमदार-खासदार यांच्या नावावर देखील थाळ्या वाढल्या जातात. जम्बो थाळी, महाथाळी, बाहुबली थाळी यांसारख्या प्रकारच्या थाळ्यावर खवैय्यांनी ताव मारला होता. आता आणखी एक थाळी खवैय्यांची वाट बघत आहे.

उल्लासनगर मधील ‘मिट अँड इट’ या हाॅटेलने एक जम्बो थाळी खवैय्यांसाठी आणली आहे. शिवजयंतीच्या निमित्तानेे या थाळीची सुरवात करण्यात आली आहे. ‘राजभोग महाराजा थाळी’ असं या थाळीला नाव देण्यात आलं आहे. या थाळीत 35 प्रकारचे पदार्थ असतील. 4 ते 5 माणसांना पुरतील एवढे पदार्थ थाळीत आहेत. 45 मिनटांत थाळी संपवल्यास त्याला एक तोळा सोनं देण्यात येण्यात येणार आहे, अशी घोषणा हाॅटेलच्या व्यवस्थापकांनी केली आहे.

मटण, चिकण, सात प्रकारचे मासे आणि अंडी यांचा थाळीत समावेश असेल. मटण आणि चिकण बिर्याणी, चार प्रकारचे भात, पापलेट, सुरमाई, बांगडा, बोंबि, चिलकन लाॅलीपाॅप यासारख्या मासांहाराचा देखील समावेश असेल. यासोबत चार प्रकारचे पापड, सोलकडी, ताक, रोटी, भाकरी, घावणे, तंटूरी हे प्रकार देखील थाळीत सजवण्यात आले आहेत.

दरम्यान, या राजभोग महाराजा थाळीत मालवणी, कोल्हापुरी, आगरी, घाटी यांसारख्या मसाल्यांचा यात वापर केला गेला आहे. नवनाथ झोटिंग आणि रेश्मा झोटिंग यांनी या थाळीची संकल्पना सादर केली आहे. अशी अफलातून आव्हान घेणाऱ्या खवैय्यांसाठी ही मोठी संधी आहे.

थोडक्यात बातम्या-

इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, दिली ‘या’ तीन चेहऱ्यांना संधी

गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण वाढले, जाणून घ्या ताजी आकडेवारी!

…तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही?- करूणा शर्मा

कार्यालयीन वेळासंदर्भात मुख्यमंत्र्यांची थेट पंतप्रधानांकडे मागणी

मास्टरच्या गाण्यावर खेळाडू थिरकले, सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय ‘हा’ व्हिडीओ

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या