बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पिल्लाचा मृतदेह सोंडेत घेऊन फिरताना दिसली हत्तीण, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्तीण तिच्या  माणासांच्यातच नव्हे तर प्राण्यांमध्ये देखील अनेक परंपरा असतात. अशातच एक मादा हत्तीण आपल्या पिल्लाचा मृतदेह घेऊन फिरताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका आईचं लहान लेकरु मृत पावलं आहे. आपल्या मृत लेकराला हत्तीण घेऊन फिरताना दिसत आहे. मृत लेकाराला घेऊन फिरण्याची त्यांची परंपरा आहे. थोड्या अंतरानंतर एका नदीजवळ हत्तीण आपल्या लेकराला सोंडीतून खाली ठेवते.

हत्तीणचा हा व्हिडीओ पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी येईल. माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येदेखील भावना असतात हे या व्हिडीओमधून स्पष्ट होतं. एवढंच नाही तर प्राणी असू नाहीतर माणूस आई ही आई असते हे देखील यातून स्पष्ट होतं आहे. एका आईने आपल्या लेकराला मरताना बघणं हे तिच्यासाठी जगातील सर्वात मोठं दुःख आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर सतत कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. अशातच जर प्राण्यांचा व्हिडीओ म्हटलं की लोक आवर्जून  पाहतात. मात्र हा व्हिडीओ काहीसा वेगळा आहे. तसेच या व्हिडीओवर अनेकांनी दुःखद कमेंट्स दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

पुण्यातील प्रसिद्ध ‘मराठे ज्वेलर्स’च्या कौस्तुभ मराठेंना अटक

“काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली 113 एकर जमिन मोकळी केली”

प्रियंका गांधी ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता!

महिन्याला फक्त 1000 रूपये जमा करा, काही वर्षांनी मिळतील तब्बल 12 लाख रूपये

काळजी घ्या! कोरोनासारखं डेंग्यूही बदलतोय आपलं रुप; धक्कादायक माहिती समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More