‘शेतकऱ्याची लाखमोलाची जमीन…’; नाना पटोलेंचा रामदेवबाबा अन् अंबानींना संतप्त सवाल
मुंबई | योगगुरू बाबा रामदेव आणि अनिल अंबानी यांच्यावर महाविकास आघाडी सरकारनं पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये बाबा रामदेव आणि अंबानी यांना नाममात्र दरानं भूखंड देऊ करण्यात आला आहे. शेतकऱ्याची लाखमोलाची जमीन कवडेमोल दरानं दिल्यावरही अद्याप यावर उद्योग का ऊभे का राहिले नाहीत, असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.
विधानसभेत बोलताना पटोले म्हणाले की, नागपूरमध्ये सुरू असलेल्या मिहान प्रकल्पामध्ये रामदेवबाबांचं तब्बल २३० एकर जमिनीवर ‘पतंजली समूह हर्बल अँड फूड पार्क’ निर्माण केलं जाणार आहे. या फूड पार्कमध्ये 50 हजार रोजगारनिर्मिती करण्यात येणार असून 5 हजार कोटींचा कच्चा मालही खरेदी केला जाईल, असंही सांगितलं जात आहे. मात्र अजून हे फूड पार्क का तयर झालेलं नाही.
एवढंच नव्हेे तर अनिल अंबानी यांच्य कंपनीलाही 289 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रिलायंस डिफेन्स याठिकाणी उद्योग उभा करणार आहे. या उद्योगातूनही जवळपास 2000 च्या आसपास रोजगारनिर्मिती करण्यात येणार होती, मात्र हा उद्योगही अद्याप उभा करण्यात आलेला नाही.
दरम्यान उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. अनिल अंबानी आणि बाबा रामदेव यांना देण्यात आलेल्या जमिनीवर अद्याप उद्योग का निर्माण झाले नाहीत. याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं देसाई यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“सचिन वाझे ठाकरे सरकारचा जावई आहे का?”
महिलांवरील शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराबाबत अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर
देवेंद्र फडणवीसांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात हक्कभंग दाखल!
‘ही माझी मोठी चूक’; राहुल गांधींच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण
दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून 60 वर्षांचे आजोबा चढले विजेच्या खांबावर, अन्…
Comments are closed.