Top News पुणे महाराष्ट्र

पुणे विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा आराखडा जाहीर

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जातील या गोष्टींचा आराखडा विद्यापीठाने जाहीर केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ही परीक्षा अवघड जाऊ नये यासाठी विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा एमसीक्यू (मल्टिपल च्वॉईस क्वोश्चन) या पद्धतीने घेणारआहे. ही परीक्षा 50 गुणांची असून त्यासाठी 1 तास वेळ असणार आहे. विद्यार्थ्यांना 60 प्रश्न दिले जाणार आहेत त्यातील 50 अचूक प्रश्नांची उत्तरे गृहीत धरली जाणार आहेत.

एमसीक्यू परीक्षेमुळे गुण कमी मिळतील किंवा अनुत्तीर्ण होऊ अशी भिती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा सोपी जावी यासाठी 40 टक्के सोपे प्रश्न, 40 टक्के अवघड आणि 20 टक्के कठीण प्रश्न असणार आहेत.

ऑनलाईल परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना इमेल आणि मोबाईलवरुन सगळी माहिती देण्यात येणार आहे. तर ऑफलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या परीक्षा केंद्रावर सुरक्षेचे सर्व नियम पाळून, ऑप्टीकल मार्क रेकग्रायझेशन (ओएमआर) शीट उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यावरुन त्यांना एमसीक्यू प्रश्न सोडवायचे आहेत. असं परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश  काकडे यांनी परिपत्रकात नमूद केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून मी काँग्रेस पक्ष सोडला- उर्मिला मातोंडकर

आरोग्यमंत्री राजेश टोपे शिरुरमध्ये थांबले असताना चौकशी दरम्यान आला ‘हा’ प्रकार समोर

“स्वत: शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं”

जनतेच्या पैशातून कंगणाला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी?- उर्मिला मातोंडकर

शरद पवारांनी ‘त्या’ प्रकरणातील बनावट कागदपत्रं सार्वजनिक करावीत- प्रकाश आंबेडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या