अखेर माय-लेकीची भेट झाली… पाकिस्तानातून आलेल्या ‘त्या’ मुलीला साडेचार वर्षांनी कळलं खरं नाव
नवी दिल्ली | भारत आणि पाकिस्तान यांच्यात रेल्वे सूरू असताना 11 वर्षाची गिता ही मुकबधिर मुलगी पाकिस्तानात चुकून गेली होती. त्यानंतर दिवंगत माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात गिता भारतात परत आली होती. गेले साडेचार वर्ष गिता भारतात तिच्या आई वडिलांच्या शोधात होती. अखेर तिला तिच्या आई वडिलांचा शोध घेण्यात यश आलं आहे.
गिता हीच खरं नाव राधा वाघमारे असून ती महाराष्ट्राच्या नायगाव या गावातील आहे. राधाच्या आईचं नाव मिना असून तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. गिता ही आपली मुलगी आहे असे अनेकांनी दावे केले होते. त्यानंतर दावेे करणारे आणि राधाचं डीएनए टेस्ट केल्यानंतर तिला तिचं खरं नाव आणि गाव भेटलं आहे. गेल्या साडेचार वर्षापासून तिला तिच्या घराच्यांची प्रतिक्षा होती.
चुकून पाकिस्तानात गेलेली राधा कराचीच्या रेल्वे स्टेशनवर ईधी नावाच्या एका सामाजिक संस्थेला ती सापडली. तिला बोलता आणि ऐकू येत नव्हतं. त्यामुळं तीचं नाव फातिमा असं ठेत वण्याआलं. मात्र, तिच्या वागण्यावरून ती मुस्लिम वाटत नव्हती. हिंदू समाजाची असल्याची कळताच तिचं नाव गिता ठेवण्यात आलं होतं. 2015 मध्ये सुषमा स्वराज यांनी तिला मायदेशी परत आणलं होतं.
दरम्यान, ईधी संस्थेच्या बिलकीस ईधी यांना राधाने फोन करून माहिती सांगितली. पाकिस्तानच्या ‘द डाॅन’ या वृत्तपत्राने याबद्दलची माहिती दिली आहे. राधा तिच्या घरच्यांना भेटून खुश असल्याचं तिनं म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंवर कारवाई व्हावी; ‘या’ खेळाडूच्या मागणीनं खळबळ
मंत्री बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यातच आत्महत्येचा प्रयत्न झाल्यानं मोठी खळबळ
बाईकवर स्टंट करताना दोघे आपटले, बघणाऱ्याच्या अंगावर येईल काटा; पाहा व्हिडीओ
कुख्यात गुंड गजा मारणेला पकडण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद; पाहा CCTV फुटेज
पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांना मोठा धक्का; 2 कुख्यात टोळ्यांमधील ‘या’ 13 जणांवर मोक्का!
Comments are closed.