बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आम्हाला आणखी पाच वर्षे द्या घुसखोरी पूर्णपणे संपवू- अमित शहा

नवी दिल्ली | आम्हाला आणखी पाच वर्षे द्या घुसखोरी पूर्णपणे संपवू, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामच्या जनतेला केलं आहे. तिनसुकीया येथे एका प्रचार सभेत बोलतना अमित शहा यांनी आसाममधील चर्चेचा विषय असलेला घुसखोरीवर त्यांनी भाष्य केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे.

आम्ही जे सांगतो ते करतो. गेल्या 5 वर्षात आसाममध्ये आंदोलन नाही, तसंच दशतवादही नाही. राज्याचा विकास शांततेनं होत आहे. आसामला घुसखोरांपासून मुक्त करण्याचं काम जवळपास झालं असल्याचं अमित शहा म्हणाले.

आम्ही दहशतवाद मुक्त आसाम करण्याचं आश्वासन दिलं होतं. 2000 पेक्षा जास्त जणांची शस्त्र खाली ठेवली आहेत आम्हाला आणखी एक पाच वर्षांची टर्म द्या घुसखोरी हा भूतकाळ बनेल. इथेही कधीही घुसखोरी होणार नाही. सर्वानंद सोनोवाल यांच्या सरकारवर विरोधी पक्ष देखील भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस सरकारच्या 15 वर्षांच्या राजवटीमध्ये चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांसाठी काहीही काम झालं नाही. आम्ही या कामगारांमधील गर्भवती महिलांसाठी योजना सुरू केली असल्याचं म्हणत शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. तर आसामच्या जनतेला दोन पर्याय आहेत त्यातील एक म्हणजे सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप आणि आसाम गण परिषद आहे. तर दुसरा पर्याय राहुल गांधी आणि बदरुद्दीन अजमल यांचं नेतृत्व हा आहे, असं शहा म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या- 

“राजकारणात काहीही होऊ शकतं नाना पटोलेसुद्धा आमच्याकडे येऊ शकतात”

शरद पवारांनी केेलेल्या ‘त्या’ भाकीतावर देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले…

आई गेली देवाघरी तर बापाने सोडलं वाऱ्यावर, बहिणीसोबत राहणाऱ्या 10 वर्षाच्या मुलीने उचललं धक्कादायक पाऊल

“शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत”

‘मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या नेत्यांनी…’; देवेंद्र फडणवीसांचा सचिन वाझेंबाबत मोठा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More