महाराष्ट्र मुंबई

गरज पडल्यास महिलांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे द्या- नीलम गोऱ्हे

मुंबई | महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित सर्व विभागांची बैठक घेतली.

महिलांच्या संरक्षणासाठी नव्याने अंमलात येणारा दिशा कायदा आणि सध्या अस्तित्वात असलेले कायदे यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. गरज पडल्यास महिलांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे देता येतील का याचाही विचार व्हावा अशी सूचना नीलम गोऱ्हे यांनी या बैठकीत केली.

महिलांसाठी पोलिसांनी नवीन हेल्पलाईन नंबर तयार केला पाहिजे. त्याच बरोबर महिला अत्याचारांच्या घटनांचा योग्य पद्धतीने तपास होऊन आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी आणखी प्रयत्न केली पाहिजे, असं मतही गोऱ्हे यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या-

एकट्याने बोगद्यात हात हलवणं सोडा, देशातील लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना सामोरे जा- राहुल गांधी

सरकार आणि जनतेला मास्क कंपन्यांनी लुटलं, ‘इतक्या’ कोटींचा नफा कमावला

मैदानावर पाय ठेवताच रोहित शर्मानं केला ‘हा’ नवा विक्रम

मुलींना संस्कारांची गरज आहे म्हणणाऱ्या भाजप नेत्याला स्मृती इराणींचा घरचा आहेर, म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या