नवी दिल्ली | मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने दरात काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सोन्याचा एप्रिलचा फ्यूचर ट्रेड 58 रुपयांच्या तेजीसह 46,959 रुपयांवर होता. तर चांदीचा मार्चचा फ्यूचर ट्रेड 140 रुपयांच्या वाढीसह 70,572 रुपयांवर पोहचला. सोने दरात काहीसा बदल झाला आहे. मात्र, चांदीचा भाव पुन्हा एकदा 70 हजार रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे.
आतंरराष्ट्रीय बाजारातही सोने दरात तेजी पाहायला मिळाली आहे. अमेरिकेत सोन्याचा दर 2.15 डॉलरच्या वाढीसह 1,813.54 डॉलर प्रति औंस इतका आहे. तर चांदीच्या दरात 0.15 डॉलरने घसरण झाली आहे. दिल्ली सराफ बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात 278 रुपयांची वाढ झाली. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा रेट 46,013 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तर चांदीचा रेट 265 रुपयांनी वाढून 68,587 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे.
दिल्लीत 23 फेब्रुवारी रोजी सोन्याचा दर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45410 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49530 रुपये
चांदीचा भाव- 70500 रुपये
गेल्या वर्षाच्या तुलनेत 2021 मध्ये सोन्याचा दर 10 हजार रुपयांनी घसरला आहे. कोरोना काळात सोन्याचा दर 55 हजारांवर पोहचला होता. कोरोना वॅक्सिन आल्यामुळे सोन्याचा दर कमी झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे. कोरोना काळात शेअर मार्केटमध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं.
दरम्यान, अनेक गुंतवणुकदारांचा सोन्याच्या गुंतवणुकीकडे मोठा कल होता. या काळात सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जात होतं. त्यामुळे सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर पोहचला होता. परंतु कोरोना लसीच्या घोषणेनंतर बाजारात तेजी आल्याने, सध्या सोन्याचा दर उच्चांकी स्तरावरून जवळपास 10 हजारांनी कमी झाला आहे.
थोडक्यात बातम्या –
सांगलीत भाजपला धक्का, जयंत पाटलांनी महापालिकेवर उधळला राष्ट्रवादीचा गुलाल
सेक्स कॉल… अभिनेते, नेते, खेळाडूंना मोठा धोका; पोलिसांची धडक कारवाई
पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार?, ‘या’ माणसाचा सल्ला मोदी ऐकणार का?
पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड काय म्हणाले?, वाचा जसंच्या तसं…
राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळाची रुपाली चाकणकरांनी उडवली खिल्ली