बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जिल्हा परिषदांमधील आरक्षणाचा फटका ओबीसी बांधवांना बसू नये म्हणून…’; अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य

मुंबई | ओबीसी बांधवाच्या हिताचं संरक्षण व्हावं अशी राज्य सरकारची ठाम भूमिका आहे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. राज्यातील ठराविक जिल्हा परिषदेतील ओबीसी समाजासाठी असलेल्या 27 टक्के आरक्षणानुसारच निवडणूका घेण्याचे निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या निर्णयावर बोलताना जिल्हा परिषदांमधील आरक्षणाचा फटका ओबीसी बांधवांना बसू नये, असं वक्तव्य पवारांनी आज विधानसभेत केलं आहे.

राज्यातील धुळे, नंदुरबार, नागपूर, वाशिम, अकोला, भंडारा या जिल्हा परिषदांवर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचं ठरल्यास या जिल्ह्यातील निवडणूका त्वरित घ्याव्या लागण्याची शक्यता असल्यानं पवारांनी सरकाच्या वतीनं याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देण्यासाठी वरिष्ठ वकिलांशी तसेच विरोधी पक्षनेते आणि दोन्ही बाजूंच्या नेत्यांशीही चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत  यासंबधी कायदेशिर व्यूहरचना ठरवण्यात येईल, असंही पवारांनी याबाबत विधानसभेत बोलताना सांगितलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या मु्द्द्यावर पवारांनी आपली बाजू मांडली.

पवार म्हणाले की, मंडल आयोग राज्यात लागू झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजासाठी आरक्षण लागू करण्यात आले. राज्य सरकार ओबीसी समाजाचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी सकारात्मक असल्याचंही पवारांनी सांगितलं. तसेच मुंबईत याप्रकरणी राज्यव्यापी बैठक बोलवणार असून आंदोलनचा इशाराही ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांंनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

नोकरीची सुवर्णसंधी; RBI मध्ये ‘इतक्या’ पदांची भरती सुरू

“मोदी सरकारची चमचेगिरी करणाऱ्यांच्या उलाढाली स्वच्छ आहेत काय?”

…अन् राज ठाकरेंनी माजी महापौरांना देखील मास्क काढायला लावला!

‘टुरिस्ट गाईड’ बनायचंय? राज्य सरकारचा हा ऑनलाईन कोर्स लवकरच सुरू होणार; सविस्तर वाचा…

अन् भर विधानसभेत ‘या’ काँग्रेस आमदारानं काढला शर्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More