बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

येत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचं चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. पुढील 24 तासांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळामध्ये रुपांतर होणार आहे. 15, 16  आणि 17 तारखेला कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या वैज्ञानिक शुभांगी भुत्ये यांनी दिली आहे.

यासोबतच 16 आणि 17 तारखेला मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये या वादळाचा प्रभाव दिसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. 15 ते 17 मे किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

आयएमडीने रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड येथे सोमवारी मुसळधार पाऊस पडेल. हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला रविवारी आणि सोमवारी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. या काळात येणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

दरम्यान, चक्रीवादळ तोक्ते मध्ये १२ तासात बदल होतील. त्यानंतर यामध्ये तिव्रता पाहायला मिळेल.  सुरुवातीला हे  चक्रीवादळ पुढे जाण्याची बरीच शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत उत्तर-उत्तर-पूर्वेकडे जाईल, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

सर्व केंद्राने करायचं मग राज्याने माशा मारायच्या का?- देवेंद्र फडणवीस

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याला चंद्रकांत पाटलांनी भरला दम; म्हणाले, औकातीत रहावं…

‘कोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार’; माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

“भारत हिंमत हरलेला नाही, तुम्ही ज्या गंभीर परिस्थितीतून जात आहात त्याची जाणीव आहे”

‘या’ खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह; भारतीय संघांच्या अडचणीत होऊ शकते वाढ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More