माझा काहीही संबंध नाही, अखेर पूजा चव्हाण प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीनं मौन सोडलं!
पुणे | पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणात घटनास्थळी उपस्थित असणारे भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. पुजा चव्हाणचा कोणताही लॅपटाॅप किंवा मोबाईल माझ्याकडे नाही. त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही, असं स्पष्टीकरण धनराज घोगरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलं.
पुण्याच्या वानवाडी येथे पुजा चव्हाणचा जेव्हा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला त्यावेळी भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे घटनास्थळी उभे होते. त्यावेळी घोगरे यांनी पुजा चव्हाणचा लॅपटाॅप आणि मोबाईल आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र. घोगरे यांनी आज थेट पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणातील आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
जिथे ही घटना घडली ते ठिकाण माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथे पोहोचलो. तिचं नाव पुजा आहे हे देखील मला माहिती नव्हतं. तिला उचलून मी फक्त रिक्षात टाकलं आणि पोलिसांना पहिला फोन मीच केला. मोबाईल आणि लॅपटाॅपचं मला माहिती नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या, असं घोगरे म्हणाले.
दरम्यान, पुजा चव्हाणचा लॅपटाॅप धनराज घोगरे यांनी चोरल्याचा आरोप बीडच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या संगिता चव्हाण यांनी केला आहे. यासोबतच त्यांंनी धनराज घोगरे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात बीड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
थोडक्यात बातम्या –
बुधवारनंतर गुरुवारी पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ, जाणून घ्या आकडेवारी
कार्तिक आर्यन समोर येताच तिने केलं असं काही की…; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा; जाणून घ्या काय आहे प्रकरण
चोरट्या चीनचा रडीचा डाव; कोरोना लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनच्या निशाण्यावर
Comments are closed.