Top News देश

‘…तर नेपाळ भारतात असता’; प्रणब मुखर्जींनी आपल्या अखेरच्या पुस्तकात सांगितली राज की बात

नवी दिल्ली | भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या जागी इंदिरा गांधी असत्या तर नेपाळ भारतात असता, असं खुलासा माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणब मुखर्जी यांच्या ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ या आत्मचरित्रात करण्यात आला आहे.

नेपाळमध्ये राणा राजवटीची जागा राजेशाहीने घेतल्यानंतर तिथे लोकशाही रुजावी अशी इच्छा होती. नेपाळचा राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह याने नेहरुंना नेपाळला भारतात सामावून घेण्याची ऑफर दिली होती. मात्र ती ऑफर जवाहरलाल नेहरुंनी फेटाळल्याचा खुलासा प्रणब मुखर्जी यांनी केला आहे.

लाल बहादूर शास्त्री यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंपेक्षा वेगळ्या भूमिका घेतल्या. त्यावेळी नेहरु यांनी नेपाळ एक स्वतंत्र देश असून तो तसाच राहिला पाहिजे सांगत ही ऑफर फेटाळली होती, असं मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नेहरुंच्या जागी इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी ही संधी अजिबात सोडली नसती, ज्याप्रमाणे त्यांनी सिक्कीमबाबत केलं होतं, असं मुखर्जींनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी किंवा सोनिया गांधी नाही तर शिवसेना ठरवणार, काँग्रेसच्या स्वाभिमान संपला”

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माचं पुनरागमन

‘आम्ही नाटक कंपनी असलो तरी…’; निलम गोऱ्हेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

“गुजराती माणसानं उद्धव ठाकरेंना आपडा म्हटलं तर तुमचा का तीळ पापडा झालाय?”

पाच वर्षांच्या चिमुकल्या नातीच्या ‘या’ वाक्यामुळे आजीने संपवलं आयुष्य!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या